कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये 50 जागासाठी भरती, जाणुन घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया. KDMC Recruitment 2025
KDMC Recruitment 2025 : नमस्कार मित्रानो कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत 50 जागासाठी भरती घेण्यात येत आहे ही भरती विशेषज्ञ् वैद्यकीय अधिकारी पदासाठी असुन राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत घेण्यात येत आहे.
ही भरती प्रक्रिया खुप दिवसापासून विचारात होती, झालेल्या बदल्या तसेच कर्मचाऱ्यांचे रिटायर्नमेंट लक्षात घेऊन ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज हा व्यवस्थित भरायचा आहे त्यासाठी खालील माहिती वाचू शकतात.
एकूण असलेल्या रिक्त जागा. –
या भरती प्रक्रियेसाठी एकूण 50 रिक्त जागा देण्यात आलेल्या आहेत. तसेच संपूर्ण पदे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका मार्फत घेण्यात येत आहेत
पदाचे नाव –
वरील सर्व जागासाठी विशेषज्ञ् वैद्यकीय अधिकारी म्हणून पदे भरून घेण्यात येत आहेत यासाठी एकूण पन्नास पद संख्या आहे.
नोकरीचे ठिकाण –
कल्याण – डोंबिवली, महाराष्ट्र राज्य.
अर्ज करण्याची पद्धत –
मित्रानो वरील पदाकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे सोबत pdf स्वरूपात अर्ज देण्यात आलेला आहे.
अर्ज करण्यासाठी शेवट दिनांक –
दिनांक 24 एप्रिल 2025 पर्यंत त्याजागी पोहोचतील अशा स्वरूपात अर्ज हे पोस्टामार्फत पाठवायचे आहे
अर्ज फी
या पदाकरिता कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात येत नाही.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार हा खालील पैकी कोणतेही एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- मेडिसिन डॉक्टर MD
- सर्जरी मास्टर MS
- डिप्लोमेट ऑफ नॅशनल बोर्ड पदवी DNB
- डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ पदवी DCH
उमेदवाराची वयोमर्यादा.
उमेदवाराची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त 70 वर्ष असावी लागेल.
असा भरा अर्ज.
- अर्ज भरण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या
- त्यानंतर संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचा.
- अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढा, आणि सर्व माहिती व्यवस्थित वाचून अर्ज भरा.
- अर्ज भरण्यासाठी निळ्या शाईचा वापर करा.
- त्यासोबत सर्व लागणारी कागदपत्रे जोडून अर्ज पोस्टामार्फत पाठवा.
मित्रानो आम्ही अर्ज आणि जाहिरात उपलब्ध करून दिलेला आहे ते pdf वाचा
अर्जाचा पत्ता
KDMC वैद्यकीय आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य
या वरील पत्यावर अर्ज पाठवा.
KDMC NHM भरती 2025 ही वैद्यकीय विभागातील भरती अजुन डॉक्टरांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.सरकारी खात्यामध्ये काम करण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकतात संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचून आणि अर्जावर भरून नंतरच अर्ज करावा