PPF अकाउंट का असावे, जाणुन घ्या यांचे लाभ आणि मिळणारा परतावा किती. Public Provident Fund
नमस्कार मित्रानो PPF खाते जर प्रत्येकाने काढले तर त्याचे खुप भारी लाभ खातेधारकाला मिळतात तेच आपण या लेखामध्ये पाहूया. PPF (Public Provident fund ) खाते हे बँक किंवा पोस्ट ऑफिस या दोन्ही पैकी फक्त एकाच ठिकाणी खोलले जाऊ शकते. PPP ही एक केंद्रसरकरची योजना आहे यामध्ये तुम्ही तुमच्या पैशांची बचत करू शकतात. तसेच जर तुमचे ppf खाते असेल तर तुम्ही यावर लोन सुद्धा काढू शकतात असे यांचे अनेक फायदे आहेत.
मित्रानो सरकार द्वारा दर 3 महिन्याला याबाबत यांचे व्याजदर सांगितले जातात. PPF द्वारा आपल्या रिटायरमेंट नंतर मुलांचे शिक्षण किंवा त्यांचे लग्न असेल किंवा स्वतःचा खर्च भागवण्यासाठी पैसा गोळा करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. PPF योजना ही सरकारची असल्यामुळे यावर चांगले रिटर्न तुम्हाला मिळतील या योजनेमध्ये कमीत कमी 100 रुपयांपासून ते जास्तीत जास्त दीड लाख रुपयापर्यंत तुम्ही गुंतवणूक करू शकतात.
PPF चा फायदा हा व्याज दर आणि टॅक्स मध्ये सूट मिळते. Public Provident Fund
मित्रानो जर तुमचे PPF चे खाते असेल तर यावर जास्तीचा व्याज मिळू शकतो. PPF अकाउंट मध्ये सध्या 8.20 टक्के व्याजदर मिळतो तुम्ही या खात्यामध्ये जितकी गुंतवणूक केली आहे त्यानुसार खात्यावर अर्जित व्याज आणि याच्या परिपकवतेवर मिळणारा पैसा हा टॅक्स फ्री आहे यावर कोणताही tax सरकार मार्फत लावला जात नाही. हे PPF वर tax वाचवणाऱ्या लोकांसाठी चांगल्या गुंतवणूक करणाऱ्या पैकी एक बनवतो
PPF वर मिळू शकतो कर्ज. Public Provident Fund
मित्रानो PPF खात्याचा आणखी एक फायदा असा आहे की खातेधारक आपल्या गुंतवलेल्या पैशावर लोन काढू शकतो. तुम्ही PPF खाते काढल्यानंतर 3 वर्षाच्या नंतर यावर लोन काढू शकता ते तुम्हाला कमी व्याजदरात दिले जाते. कमीत कमी हे 1 टक्यापर्यंत सुद्धा मिळू शकते लोन घेतल्यानंतर 36 महिन्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण पणे भरावे लागेल त्यामुळे तुम्हाला तुमच्या मिळणाऱ्या राशिवरील व्याजदरात कोणतेही बदल होणार नाहीत.
लहान मुलांसाठी ही काढू शकता खाते. Public Provident Fund
मित्रानो जर तुमच्या घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांच्या नावे सुद्धा तुम्ही PPF( Public Provident Fund ) चे खाते काढू शकतात, भविष्यामध्ये काही अडचणीसाठी बचत करण्याचा हा उत्तम पर्याय आहे. PPF हे long term साठी बचत करण्याचा एक चांगला पर्याय आहे
आणि लवकर हे सुरु केल्यामुळे भविष्यात एक चांगला आर्थिक फंड जमा करण्यासाठी मदत होते. हे खाते फक्त मुलांचे आई वडील किंवा जवळच्या एखाद्या व्यक्तीकडूनच काढू शकतात. मुलगा हा भारतीय नागरिक असावा किंवा विदेशात राहणारा भारतीय नागरिक असावा हे खाते पूर्ण पणे मुलांच्या नावे असावे यामध्ये आई वडील हे फक्त अभिभावक म्हणून काम पाहतील.
जर तुम्ही PPF खाते 5 वर्षासाठी काढले असेल तर तुम्ही PPF पिरियड सुद्धा वाढवुन घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला चांगले रिटर्न मिळतील तुम्ही ते कितीही वर्षापर्यंत खाते लॉक करू शकतात तसेच खातेधारक हा आपल्या खात्यामध्ये जास्तीची आर्थिक राशी सुद्धा जमा करू शकतात ज्यामुळे या पैशावर परतावा एकदम उत्तम मिळेल.
PPF खाते काढण्याच्या अगोदर बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन पूर्ण माहिती घेऊनच नंतर गुंतवणूक करावी त्यामुळे तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील.
Leave a Reply